Pm Kisan Yojana : देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्यासंदर्भात. पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेची सुरुवात 2019 मध्ये वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. ही योजना पीएम मोदी यांच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात दिले जात नाहीत.
म्हणजेच ही 6000 रुपयाची रक्कम एकरकमी न देता दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
14 वा हफ्ता नुकताच 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील साडेआठ कोटी पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. वास्तविक या योजनेच्या माध्यमातून दर चार वर्षांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता मिळतो.
पण 14 वा हप्ता मिळण्यास थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे पंधराव्या हफ्त्याला देखील उशीर होणार असे शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र या योजनेचा पुढील हप्ता हा वेळेतच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समधून पंधरावा हप्ता केव्हा मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या रिपोर्ट्सवर जर विश्वास ठेवला तर केंद्र शासन देशभरातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा पंधरावा हप्ता 12 नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे. निश्चितच जर दिवाळीच्यापूर्वीच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यामुळे मोठा हातभार लागणार आहे.
मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो असे सांगितले जात आहे. म्हणजेच येत्या अडीच महिन्याच्या काळात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता आहे.