Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एक मोठी भेट देणार आहे.
सरकार पीएम किसानचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणार अशी बातमी समोर आली आहे. खरतर गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हप्ता दिवाळीच्या पूर्वी खात्यात जमा होणार का हा सवाल उपस्थित केला जात होता.
खरंतर या योजनेचा मागील हफ्ता म्हणजे 14 वा होता हा 27 जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
अशातच आता या योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच पंधरावा हफ्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 नोव्हेंबर 2023 रोजी या योजनेचा पंधरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. बारा नोव्हेंबरला अर्थातच लक्ष्मी कुबेर पूजनच्या दिवशी या योजनेचा पंधरावा हफ्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा होईल अशी शक्यता काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
तसेच एका मीडिया रिपोर्ट मध्ये या योजनेचा पुढील हप्ता हा 15 नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल असे सांगितले जात आहे.
यामुळे हा हप्ता 12 नोव्हेंबरला मिळतो की 15 नोव्हेंबरला हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि, केंद्र शासनाच्या माध्यमातून पुढील हप्त्या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे हा हप्ता 12 नोव्हेंबरला किंवा 15 नोव्हेंबरला जमा होईलच हे नक्की नाही.
पण दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार हा हफ्ता संबंधित तारखांना जमा करू शकते ही शक्यता नाकारताही येत नाही. यामुळे आता केंद्राकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो हे विशेष पाहण्यासारखे ठरेल. दरम्यान, दिवाळीच्या काळात या योजनेचा पैसा शेतकऱ्यांना मिळाला तर निश्चितच त्यांची दिवाळी या निमित्ताने गोड होणार आहे.