Pune Metro News : पुणे शहरातील रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे मेट्रोची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुरू झालेले मेट्रो मार्गाचे दोन टप्पे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच सुरू झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांनी वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड ते सिविल कोर्ट स्थानक पर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला आहे.
हे दोन मेट्रो मार्ग सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवास गतिमान झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विस्तारित मेट्रोमार्गांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद देखील दिला जात आहे. अशातच आता या मेट्रो मार्गांचा देखील विस्तार केला जाणार आहे.
खरंतर एक ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारित मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या विस्तारित मेट्रोमार्गांचा विस्तार केव्हा होणार हा प्रश्न पुणेकरांना पडला होता. याबाबत पुणेकरांना जाणून घेण्याची मोठी उत्सुकता देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान विस्तारित मेट्रो मार्गांचा विस्तार केव्हा होणार याबाबत मेट्रो कडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
कुठंपर्यंत आणि कधी होणार विस्तार
मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, वनाझ ते रुबी हॉल दरम्यानच्या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. या मार्गाचा विस्तार तिसऱ्या टप्प्या अंतर्गत रामवाडीपर्यंत केला जाणार आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या टप्प्यातील रामवाडी पर्यंतच्या मेट्रोमार्गाच काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेट्रोने सांगितले की, या मार्गावरील बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी मेट्रो स्टेशनची कामे 90 टक्के पूर्ण झाली आहेत तसेच इलेक्ट्रिक, सिग्नलिंगची कामे देखील केली जात आहेत. तसेच, इतर तांत्रिक कामे वेगाने सुरू आहेत. त्यानंतर सीआरएमएसची चाचणी पूर्ण करून नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग पुणेकरांसाठी खुला होऊ शकतो. याचाच अर्थ या वर्षाच्या अखेरपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार असा अंदाज आहे.
तसेच पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट या दुसऱ्या विस्तारित मेट्रो मार्गाचा देखील विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचा स्वारगेटपर्यंत विस्तार होणार आहे. म्हणजे आता सिव्हील कोर्ट ते स्वारगेट दरम्यान मेट्रोमार्ग विकसित होणार असून हा संपूर्ण मार्ग भुयारी राहणार आहे. या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी भुयारी स्टेशन राहणार आहेत.
मेट्रो ने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून फेब्रुवारी 2024 मध्ये या मार्गाचे पूर्ण काम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्ग फेब्रुवारी 2024 नंतर प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो.