Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. याचा परिणाम शेती क्षेत्रावर सर्वाधिक झाला असून यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.
दरम्यान कमी पावसामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच मात्र पुणेकरांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातून मोठा पाऊस गायब झाला असल्याने आता वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा रस्ता सुरू करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने भोरहुन महाड कडे जाणारा वरंध घाट रस्ता सर्व वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अतिवृष्टीच्या काळात वरंध घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. दरवर्षी पावसाळ्यात वरंध घाटात दरड कोसळण्याच्या, रस्ता खचण्याच्या आणि भराव वाहून जाण्याच्या घटना घडत असतात.
यामुळे अपघात होण्याची दाट भीती असते. या घटनांमुळे अनेकदा जीवितहानी आणि वित्तहानी घडते. अशा परिस्थितीत जिवित हानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला कनेक्ट करणारा वरंध घाट 22 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केला होता.
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या घाटात अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. अतिवृष्टीमुळे घाट सेक्शनमध्ये दरड कोसळू शकते, रस्ता खचू शकतो अन यामुळे जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत हा घाट 22 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र आता राज्यातील पाऊस थांबला आहे.
शिवाय आगामी काही दिवस जोरदार पाऊस होणार नाही असा अंदाज आहे. म्हणून आता हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हा घाट आजपासून अर्थातच 25 ऑगस्ट 2023 पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, स्थानिक रहिवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.