स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज; महाराष्ट्रात ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडणार की नाही ? काय म्हणतंय स्कायमेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Skymet Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र सर्वत्र जुलै महिन्यात चांगला जोराचा पाऊस बरसला. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली.

परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. शेत-शिवारात काम करताना शेतकऱ्यांचे मन लागत होते. जून महिन्यात उदास असणारे शेतकरी जुलै महिन्यात मात्र मोठे आनंदी होते. परंतु ऑगस्ट महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी खूपच चिंताजनक राहिली आहे.

या चालू ऑगस्ट महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा जोर खूपच कमी आहे. राज्यात तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बहुतांशी भागात मात्र पावसाने दांडी मारली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

सध्या खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या अवस्थेत पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज आहे. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येऊ लागले आहेत. तसेच खानदेश मराठवाडा आणि विदर्भात कपाशीचे पीक देखील 40 ते 50 दिवसांचे झाले आहे.

या अशा अवस्थेत कपाशीला देखील पाण्याची गरज आहे. ऑगस्टचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्याने आता दुसऱ्या पंधरवड्यात तरी पाऊस पडणार का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खाजगी संस्थेने हवामानाबाबत एक महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच येत्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पण समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तयार होत आहे.

शिवाय या आगामी पंधरवड्यात जोरदार पावसाची शक्यता फारच कमी असल्याचे मत स्कायमेटच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे. साहजिकच सध्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे मात्र या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर अपेक्षित असा राहणार नसल्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

याबाबत स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा एकदा बरसणार आहे. पण आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

एवढेच नाही तर पंजाब, हरीयाणा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे. समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज आहे.

एकंदरीत मुंबईसह राज्यातील बहुतांशी भागात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडणार असं सांगितलं जात आहे मात्र पावसाचा जोर हा कुठे ना कुठे कमी राहणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या पंधरवड्यात देखील पहिल्या पंधरवण्याप्रमाणेच सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांसाठी ही बातमी थोडीशी चिंताजनक आहे.

Leave a Comment