व्यवसाय सुरु करायचाय ? 10 हजारापेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे ‘हे’ व्यवसाय ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : गेल्या काही वर्षात देशात व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असायला पाहिजे अशी इच्छा तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. जर तुमचीही अशीच इच्छा असेल आणि तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच फायदेशीर ठरू शकते.

खरंतर, काही तरुणांकडून व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र पुरेसे भांडवल नाही अशी तक्रार केली जात होती. यामुळे आज आपण ज्या तरुणांकडे पुरेसे भांडवल नाही ते त्यांच्या स्किल सेटचा वापर करून अगदी 10 हजारापेक्षा कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू करू शकतात याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत कोणते व्यवसाय केले जाऊ शकतात याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

10 हजार रुपये गुंतवणुकीत सुरु होणारे व्यवसाय

कंटेंट क्रिएशन : अलीकडे स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. भारतात तर प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या संधीचा फायदा घेऊन यूट्यूब, ब्लॉग वेबसाईट सुरु करू शकता. युट्युबवर तुम्ही विविध विषयांवरील व्हिडिओ बनवून अपलोड करू शकता. तुमची ज्या विषयावर पकड आहे त्या विषयातील व्हिडिओ तुम्ही youtube वर टाकू शकता. जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही एक ब्लॉग वेबसाईट तयार करू शकता. येथे तुम्ही विविध विषयावरील ब्लॉग किंवा न्यूज टाकू शकता. ब्लॉग आणि युट्युबवर तुमचा रिच वाढला तर तुम्ही गुगल अडसेन्स किंवा अफिलेट मार्केटिंग करून चांगले उत्पन्न कमवू शकता.

सल्लागार : जर तुम्ही व्यवसाय, फिटनेस, आर्थिक, लाईफ कोचिंग यासारख्या कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवलेले असेल तर तुम्ही स्वतःची सल्लागार म्हणजेच कन्सल्टन्सी फर्म चालू करू शकतात. तुम्ही हा तुमचा व्यवसाय ऑनलाइन देखील सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रभावीपणे वापर करावा लागणार आहे. शिवाय जर तुम्ही हा व्यवसाय ऑनलाइन सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला यासाठी वेबसाईट तयार करावी लागणार आहे.

हस्तकला : भारत देश हा विविधतेने नटलेला आणि कलेचा मोठा उपासक देश आहे. इथे कलेला नेहमीच मानाचे स्थान मिळाले आहे. जर तुम्ही हस्तनिर्मित दागिने तयार करत असाल किंवा हस्तनिर्मित वस्तू तयार करण्याचा तुम्हाला छंद असेल तर तुम्ही याचे व्यवसायात रूपांतर करू शकता. तुम्ही हस्तनिर्मित दागिने अथवा वस्तू स्टॉल, दुकान किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री करून तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकता.

ट्युशन : जर तुम्ही एखाद्या विषयात प्राविण्य मिळवले असेल तर तुम्ही शिकवणी अर्थातच ट्युशन घेऊ शकता. कोणत्याही विषयातील ट्युशन सुरु केले जाऊ शकते. जर समजा तुम्ही योगामध्ये शिक्षण घेतलेले असेल, यात तुमचे प्राविण्य असेल तर तुम्ही योगा टीचर म्हणून ट्युशन सुरू करू शकता आणि हे ट्युशन तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुरू करू शकता.

Leave a Comment