Soyabean Rate Hike : सोयाबीन उत्पादकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोयाबीन बाजारभावात आता वाढ होऊ लागली आहे. दिवाळीच्या काळात बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार असे आशादायी चित्र तयार होत आहे. वास्तविक, सोयाबीन हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची आणि उत्पन्नाची हमी देते.
पण गेल्या दोन हंगामाचा विचार केला असता हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरले आहे. गेल्या दोन हंगामापासून पिवळं सोनं काळवंडल आहे. मालाला अपेक्षित अशा भाव मिळत नसल्याने पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये.
यंदा तर परिस्थिती फारच बिकट आहे. यंदा मान्सून काळात सरासरी असा पाऊस बरसला नसल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त केली जात. शेतकऱ्यांना एकरी तीन-चार क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळेल असे वाटतं आहे.
त्यामुळे यंदा तरी मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांनी उराशी बाळगली आहे. मात्र या हंगामाची सुरुवात सोयाबीन उत्पादकांसाठी चिंतेची ठरली आहे.
कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात होते. पण आता सोयाबीन बाजारभावाने हमीभावाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये आता सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक दरात विक्री होत आहे.
यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्याने होरपळलेला बळीराजाला आता कुठे दिलासा मिळत आहे. काल झालेल्या लिलावात राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनला 5000 पेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल असे सांगितले जात आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर
मेहकर : काल अर्थातच 4 नोव्हेंबर रोजी मेहकरच्या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4500, कमाल 5280 आणि सरासरी चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
जालना : जालनाच्या मार्केटमध्ये कालच्या लिलावात सोयाबीनला किमान 4000, कमाल 5150 आणि सरासरी 4800 एवढा भाव मिळाला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती : कालच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार तीनशे, कमाल 5175 आणि सरासरी 4737 एवढा भाव मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : उमरेडच्या बाजारात 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान 3500, कमाल 5140 आणि सरासरी 4700 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे.
धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती : धामणगाव रेल्वे या एपीएमसीमध्ये कालच्या लिलावात सोयाबीनला किमान चार हजार दोनशे, कमाल 5000 आणि सरासरी 4500 एवढा भाव मिळाला आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : 4 नोव्हेंबरला या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4870, कमाल 5130 आणि सरासरी 4960 रुपये एवढा भाव नमूद करण्यात आला आहे.