Soybean Market Price : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश राजस्थान यांसारख्या राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे.
याची लागवड आपल्या देशात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. तसेच मध्य प्रदेश राज्यात एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन घेतले जाते.
म्हणजे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी सर्वस्वी या पिकावर अवलंबून आहेत.
दरम्यान देशभरातील सोयाबीन उत्पादकांसाठी अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने सोयाबीन उत्पादन बाबत एक अहवाल सार्वजनिक केला आहे.
या अहवालानुसार, यावर्षी भारतात सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला असल्याने सोयाबीन उत्पादनात विक्रमी घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी जवळपास एक मिलीयन टन सोयाबीन उत्पादन घटेल असा अंदाज आहे.
यावर्षी फक्त 11 मिलीयन टन उत्पादन निघणार असा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल असे सांगितले जात आहे. खरंतर सध्या नवीन हंगामातील सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. अनेक ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.
मात्र आगामी काही दिवसात बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासह चीन, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये देखील सोयाबीनचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज आहे. एकंदरीत सोयाबीनचे जागतिक उत्पादन कमी होणार असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव येत्या काही दिवसात वाढतील असे सांगितले जात आहे.