यंदा ‘पिवळं सोन’ शेतकऱ्यांना मालामाल बनवणार ! सोयाबीन 6 हजाराच्या उंबरठ्यावर, आणखी भाव वाढणार का?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात या पिकाची लागवड होते.

पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात हे पीक उत्पादित केले जाऊ लागले आहे. वास्तविक शाश्वत उत्पादन आणि दराची हमी यामुळे हे पीक गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनले आहे. या पिकाला बाजारात नेहमीच चांगला भाव मिळतो अशी धारणा शेतकऱ्यांची आहे.

अलीकडे मात्र ही धारणा फेल ठरू लागली आहे. कारण की गेल्या दोन वर्षांपासून पिवळं सोनं अगदी कवडीमोल दरात विकल जात आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. यामुळे गेल्या हंगामातही मालाला चांगला भाव मिळेल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना होती.

पण गेल्या वर्षी शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली होती. यंदा मात्र मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. अशा स्थितीत यंदा चांगला दर मिळेल असे वाटत होते.

परंतु या नवीन हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी खूपच निराशाजनक ठरली आहे. कारण की सोयाबीनला नवीन हंगामाच्या सुरुवातीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता. जवळपास दिवाळीपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहिली.

पण आता परिस्थिती थोडीशी बदलली आहे आणि सोयाबीन हमीभावापेक्षा अधिकच्या दरात विकला जात आहे. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला समाधानकारक दर मिळाला आहे.

सोयाबीन आता सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. यामुळे आगामी काळात आणखी भाव वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. एकंदरीत भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कुठे मिळाला विक्रमी भाव?

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये आज 2538 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली होती.

या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 4800, कमाल 5400 आणि सरासरी पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. अर्थातच बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे.

दिवाळीच्या आधी कमाल बाजारभाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी होते मात्र आता बाजारभावाने साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा टप्पा गाठला आहे. पण शेतकऱ्यांची किमान सरासरी 6,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे.

Leave a Comment