Soybean Rate : सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखल जात आहे. याचे कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळते. कॅश क्रॉप अर्थातच नगदी पीक म्हणून या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये या पिकाची शेती पाहायला मिळते.
याशिवाय खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली आहे. एकंदरीत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या दोन हंगामापासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यावेळी सोयाबीन सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल या विक्रमी भावात विकले गेले होते.
पण गेल्या हंगामापासून सोयाबीन दर दबावात आहेत. या चालू हंगामात देखील सोयाबीनचे दर दिवाळीपर्यंत चांगलेच दबावात होते. विशेष म्हणजे हंगामाच्या ऐन सुरुवातीला म्हणजेच विजयादशमीच्या आसपास सोयाबीन दर हमीभावापेक्षा कमी होते.
मात्र दिवाळीनंतर आता हळूहळू बाजारभावात सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीन 4700 ते 5200 या सरासरी बाजारभावात विकले जात आहे.
तर काही ठिकाणी कमाल बाजारभावाने 5400 रुपयांचा टप्पा गाठला आहे. आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीन किमान 4800, कमाल 5400 आणि सरासरी 5275 याप्रमाणे विकला गेला आहे.
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4650, कमाल 5200 आणि सरासरी 4850 एवढा भाव मिळाला आहे.
आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीन किमान चार हजार 650, कमाल 5260 आणि सरासरी 4985 या भावात विकला गेला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4850, कमाल 5175 आणि सरासरी पाच हजार 100 एवढा भाव मिळाला आहे.
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 5140, कमाल 5300 आणि सरासरी 5220 एवढा भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान पाच हजार पन्नास, कमाल 5130 आणि सरासरी 5 हजार 90 एवढा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार चारशे, कमाल 5175 आणि सरासरी 4981 एवढा भाव मिळाला आहे.
हिंगोली एपीएमसी : या बाजारात आज सोयाबीन किमान 4815, कमाल 5230 आणि सरासरी 5 हजार 22 या भावात विकले गेले आहे.
लातूर : या बाजारात आज सोयाबीन किमान 5000, कमाल 5281 आणि सरासरी 5180 या भावात विकले गेले आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीन किमान चार हजार दोनशे, कमाल 5350 आणि सरासरी पाच हजार 100 या भावात विकले गेले आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान चार हजार दोनशे, कमाल 5295 आणि सरासरी 5000 एवढा भाव मिळाला आहे.