राज्य कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘ही’ प्रलंबित मागणी होणार मान्य, शिंदे सरकारचे संकेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून ओल्ड पेन्शन स्कीम अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू करणे अन सेवानिवृत्तीचे वय वाढवणे यासाठी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

या प्रमुख मागणीसाठी संबंधित नोकरदार मंडळींने वेळोवेळी आंदोलन देखील केले आहे. अशातच आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 5 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले आहे.

खरे तर राज्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवावे याबाबत शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली.

यानुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषी विभागअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे.

कृषी विभागातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्षे करण्यात आले आहे.

परंतु राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवावे अशी मागणी आहे.

दरम्यान शासनाने कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे. यामुळे इतरही विभागातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होऊ शकते अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.

राज्य शासनाने नुकत्याच कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे जाहीर केले असल्याने भविष्यात राज्यातील इतरही राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढू शकते असा आशावाद व्यक्त होत आहे.

विशेष बाब अशी की, राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रस्तावावर आता केव्हा सकारात्मक निर्णय होणार आणि राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केव्हा वाढणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment