Sugarcane Farming : राज्यात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. हे एक प्रमुख बागायती पीक आहे. बागायती भागात या पिकाची सर्वाधिक लागवड होते. महाराष्ट्रातही जवळपास सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात या पिकाची लागवड पाहायला मिळते. खरंतर ऊस पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऊस पिकावर विविध कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात घट आली आहे. ऊस पिकात रसशोषक किटकाचा प्रादुर्भाव केल्या काही दशकात मोठा वाढला आहे. यामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळतो.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरी माशीचे प्रौढ कीटक 3 मि.मी. लांब असते. या किटकाचे पंख सफेद असतात. पण लहान पतंग काळ्या रंगाचे असते. या लहान पतंगाला पंख नसतात. असं सांगितलं जातं की, या कीटकाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात पाहायला मिळतो. याचा परिणाम हा लूसलुशीत पिकावर अधिक दिसून येतो.
हे किटक पानांचा रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर काळे चिकट पदार्थ साचतात आणि दुरूनच पीक पिवळे दिसू लागते. या कीटकामुळे उत्पादनात मोठी घट येते. यामुळे या कीटकाचा प्रादुर्भाव झाल्यास ताबडतोब यावर उपाययोजना करून नियंत्रण मिळवावे लागते. दरम्यान आज आपण या कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं करणार नियंत्रण ?
या किडीपासून पीक वाचवण्यासाठी वेळोवेळी कोरडी पाने काढून जाळून टाकावीत. शेतात पाणी साचू देऊ नका, पण जमिनीतील ओलावा कायम ठेवावा अशी माहिती कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच Imizacloprid 17-8 SL हे कीटकनाशक 500ml घेऊन तुम्ही पिकावर फवारू शकता.
हे औषध आपण 100 लिटर पाण्यात मिसळून 20 किलो युरिया मिसळल्यानंतर ते शेतात फवारावे. युरियाच्या वापराने पीक पुन्हा वाढू लागेलं आणि या पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणार आहे.