Thane News : मुंबई शहर, उपनगरासह राज्यातील विविध भागात सध्या रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अशातच कल्याण, डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आली आहे. हे अपडेट कल्याण ते डोंबिवली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचे आणि खास राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, कल्याण ते डोंबिवली हा प्रवास करण्यासाठी ठाकुर्ली ते चोळगाव हा रस्ता खूपच महत्त्वाचा आहे. कल्याण ते डोंबिवली हा प्रवास या मार्गानेच केला जात आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. हा रस्ता खूपच वर्दळीचा असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. अशा परिस्थितीत ही वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी या रस्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या रस्त्यावर सातत्याने डांबरीकरण केले जात आहे मात्र वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने डांबरीकरण उपटत आहे. त्यामुळे आता या रस्त्यावर डांबरीकरण न करता थेट पेव्हर ब्लॉक टाकून रस्ता चकाचक केला जाणार आहे. मात्र या कामासाठी जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असून या पंधरा दिवसांसाठी हा रस्ता बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आज 25 ऑक्टोबर 2023 पासून हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या कालावधीमध्ये पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण हा रस्ता पंधरा दिवसांसाठी बंद राहणार असल्याने या रस्त्याला पर्यायी मार्ग कोणता राहील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पर्यायी मार्ग नेमके कोणते राहणार ?
कल्याण दिशेने 90 फुटी रस्त्याने हनुमान मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हनुमान मंदिर येथे थांबवले जाईल आणि ही वाहने फशीबाई भोईर चौक किंवा बंदिश हॉटेल येथून घरडा सर्कलमार्गे इच्छित स्थळी रवाना केले जातील अशी माहिती समोर आली आहे.
तसेच डोंबिवलीतील पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली उड्डाण पूलकडून ठाकुर्लीतील जुने हनमान मंदिर दिशेने येणाऱ्या वाहनांना ठाकुर्ली पूर्वेतील बँक ऑफ महाराष्ट्र, रामभाऊ चौधरी चौक येथे थांबवले जाणार आहे.
तथापि, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि रस्ता ज्या काळात बंद असेल त्या काळात पर्यायी मार्गाने वाहतूक करावी असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. एकंदरीत हा रस्ता पंधरा दिवसांसाठी बंद राहणार असल्याने या कालावधीत या भागातील नागरिकांना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.