Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रब्बी हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधव लगबग करत आहे. काही भागात रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही पेरणीची कामे अपूर्ण आहेत.
गव्हाचा विचार केला असता वेळेवर गव्हाची पेरणी कधीच पूर्ण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर प्रयत्न करता आले नाही ते शेतकरी आता उशिरा गहू पेरणी करणार आहेत. पण 15 डिसेंबर पर्यंतचं शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी पूर्ण करावी असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.
खरे तर, राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र तरी आज आम्ही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गव्हाच्या एका विशिष्ट आणि नव्याने विकसित झालेल्या सुधारित जाती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण गव्हाच्या पूसा गौतमी एचडी 3086 या वाणाविषयी जाणून घेणार आहोत.
पुसा गौतमी एचडी 3086
गव्हाचा हा वाण अलीकडेच विकसित झाला आहे. नव्याने विकसित झालेला हा वाण तब्बल 81 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन देत असल्याचा दावा केला जात आहे. पुसा गौतमी एचडी 3086 ही जात वेळेवर पेरणी आणि बागायती भागासाठी योग्य मानली जाते.
हा वाण कोरडवाहू भागासाठी योग्य नाही. या गव्हाच्या जातीला चांगले पाणी लागते. मात्र उत्पादनाच्या बाबतीत हा वाण इतर वाणाच्या तुलनेत सरस आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा वाण उत्तर-पश्चिम मैदानी भागात पेरला जाऊ शकतो.
तिथे या जातीचे पीक जवळपास १४५ दिवसांत तयार होते. म्हणजेच हा वाण त्या भागात उशिराने काढण्यासाठी तयार होतो. गव्हाचे पीक सरासरी 115 ते 120 दिवसात परिपक्व होत असते.
पण या संबंधित भागात या जातीच्या गव्हाच्या पिकाला परिपक्व होण्यासाठी अधिक काळ लागतो. मात्र ईशान्येकडील मैदानी भागात हा वाण लवकर परिपक्व होतो.
ईशान्य कडील भागांमध्ये या जातीचे पीक केवळ १२१ दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे ही जात पिवळ्या व तपकिरी तांबेरा रोगास प्रतिरोधक असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. तसेच या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त आढळते.
या जातीपासून कमाल 81 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते तर अवरेज उत्पादन 60 क्विंटल प्रती हेक्टर एवढे आहे. पण या जातीपासून मिळणारे उत्पादन हे हवामान, भौगोलिक प्रदेश, पाणी, शेतकऱ्यांचे नियोजन या साऱ्या बाबींवर अवलंबून राहते.