Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कायमचा नवनवीन योजना चालवल्या जातात. खरंतर आपला देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण की देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे.
मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक संकटांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये शेत जमिनीचेही अनेक वादविवाद आहेत. यात अनेक वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा भावकीतील जमिनीचा गट एकमेकांच्या नावावर झाले आहेत.
काही शेतकऱ्यांची बारा वर्षांपूर्वी तर काही शेतकऱ्यांची पंधरा वर्षांपूर्वी जमिन खरेदी-विक्री करताना राहिलेल्या त्रुटींमुळे किंवा वडिलांच्या नावे एका गटातील जमीन, पण वहिवाटीला दुसऱ्याच गटातील जमीन अशी समस्या आहे. या समस्येमुळे अनेकदा वाद-विवाद देखील होतात.
दरम्यान शेतकऱ्यांना या समस्येतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना राबवली जात आहे. या सलोखा योजनेमुळे या चुकांची दुरुस्ती शक्य होणार आहे. दरम्यान आज आपण सलोखा योजनेतून शेत जमिनीच्या गटाची अदलाबदल करण्यासाठी कुठे अर्ज करावा लागणार, याची प्रोसेस काय आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कुठे अर्ज करावा लागणार
शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या गावातील तलाठ्याकडे अर्ज करायचा आहे. सलोखा योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर दस्तूर खुद्द तलाठी संबंधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर जाऊन पंचनामा करणार आहेत.
पंचनामे झाल्यानंतर मग तलाठ्यांच्या माध्यमातून याचा अहवाल मुद्रांक शुल्क विभागाकडे पाठवला जाणार आहे. यानंतर मग फक्त एक हजार रुपयाच्या नाममात्र शुल्कात त्या शेतकऱ्यांना त्यांची त्यांची जमीन मिळून जाणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून केवळ एका तासात शेत जमिनीच्या गटांची अदलाबदली करून मिळणार आहे. यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.
खरंतर पूर्वी या प्रकारच्या जमिनीची अदलाबदल करण्यासाठी मंडलाधिकार, तहसीलदार यांच्या माध्यमातून प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज करावा लागत असे. एवढेच नाही तर अनेक प्रकरणात वकिलांच्या माध्यमातून संबंधितांना आपली बाजू मांडावी लागत असे.
यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा मोठा पैसा आणि वेळ खर्च होत असे. मात्र आता शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार असून सलोखा योजनेतून मात्र एका तासात आणि 1000 रुपयात शेतजमिनीची अदलाबदल शक्य होणार आहे.