महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan Yojana Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 23 ते 24 जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यभर लागवड होते. अर्थातच राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे.

मात्र हे नगदी पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. या चालू वर्षातील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये कांदा या नगदी पिकाला खूपच कवडीमोल दर मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान देण्याची मागणी त्यावेळी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. शेतकरी, शेतकरी संघटना आणि विरोधकांच्या माध्यमातून यासाठी वर्तमान शिंदे आणि फडणवीस सरकारवर दबाव तयार करण्यात आला.

या दबावापुढे सरकार नमते झाले आणि सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची घोषणा केली. यासाठीचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयानुसार राज्यातील लेट खरीप हंगामातील कांद्यासाठी राज्य शासनाने 350 रुपये प्रति क्विंटल प्रति शेतकरी दोनशे क्विंटलच्या मर्यादेत अनुदान देण्याचे जाहीर केले.

एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनुदानाची घोषणा झाली यासाठी संबंधित कांदा उत्पादकांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेत. मात्र आता या घोषणेला जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे.

पण अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असे सांगितले जात होते, पण अस काही झालं नाही. अशातच मात्र कांदा अनुदानासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आवश्यक असलेल्या 844 कोटी पैकी 465.99 कोटी रुपये एवढा निधी राज्याच्या पणन विभागाला वितरित करण्यात आला आहे.

तसेच कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान मिळणार याची यादी देखील शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेल्या 844 कोटी पैकी 465.99 कोटी एवढा निधी पहिल्या टप्प्यासाठी उपलब्ध झाला आहे.

यातून राज्यातील 23 जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदानाचा हा लाभ तीन लाख 36 हजार 476 शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे याची यादी पाहणार आहोत.

शासनाने 18 ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार, नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच शंभर टक्के अनुदान वितरित केले जाणार आहे.

तसेच नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या 10 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 53.94% एवढा अनुदानाचा निधी वितरित होणार असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निधी दिला जाणार आहे.

Leave a Comment