Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाच्या सणाची आज सांगता होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन झाले होते. तेव्हापासून संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदात गणेशोत्सवाचा सण साजरा होत आहे.
आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. आज डबडबत्या डोळ्यांनी गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत आज गणेश भक्त ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला विसर्जित करणार आहेत. यामुळे आज संपूर्ण देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे.
सोबतच गणेश भक्तांची डोळे पाणावलेली देखील आहेत. गणरायाच्या आगमनामुळे गणेश भक्तांची सर्व विघ्ने हरून गेली आहेत. दरम्यान आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. खरंतर, आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यातील बहुतांशी मार्केटमध्ये केवळ सकाळच्या सत्रात लिलाव झाले आहे.
दुपारच्या सत्रात आज राज्यातील सर्वच मार्केट बंद राहणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. यामुळे मात्र नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक संकटात आले आहेत.
जिल्ह्यातील विंचूर एपीएमसी मध्ये आज पासून लिलाव सुरू झाले आहेत मात्र इतर बाजार समितीमध्ये अजून लिलाव सुरू झालेले नाहीत. आता आपण राज्यातील बाजारात आज कांद्याला काय भाव मिळाला याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
कांद्याला काय भाव मिळाला?
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 2411 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 1000, रुपये कमाल 3000 रुपये आणि सरासरी 1900 रुपये भाव मिळाला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 400 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी 2250 एवढा भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज बारा हजार 206 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 2600 आणि सरासरी 1800 भाव मिळाला.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 643 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच्या लिलावा या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल दोन हजार आणि सरासरी एक हजार दोनशे रुपये भाव मिळाला.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आजपासून लिलाव सुरू झाले आहेत. आज या मार्केटमध्ये 6500 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 2401 आणि सरासरी 2175 रुपये भाव मिळाला.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 14 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2000, कमाल 2400 आणि सरासरी 2200 रुपये भाव मिळाला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 500 क्विंटल पांढरा कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2500, कमाल 3500 आणि सरासरी 3250 रुपये एवढा भाव मिळाला.