Maharashtra Rain Alert : गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. खरंतर जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ असतो. यंदा मात्र या पावसाळी काळातच पाऊस गायब झाला आहे. एक ऑगस्ट पासून ते जवळपास आतापर्यंत म्हणजेच 17 ते 18 दिवसापासून राज्यातुन पाऊस गायब झाला आहे.
यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पाऊस पडत नसल्याने या हंगामातील पिके वाया जाण्याची भीती आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर यांसारखी पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. पावसाअभावी पिके करपण्याचा धोका वाढत आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागून आहेत.
गेल्या महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस कुठे गायब झाला आणि आता जोरदार पावसाचे कमबॅक होणार की नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
18 ऑगस्ट पासून राज्यात आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. याबाबत नागपूर वेधशाळेने देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. Nagpur Weather Department ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, विदर्भात १८ ऑगस्ट नंतर सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज म्हणजे १८ ऑगस्टला राज्यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या ठिकाणी सर्वत्र पाऊस होईल असा अंदाज आहे.
निश्चितच नागपूर वेधशाळेचा हा अंदाज खरा ठरला तर विदर्भातील जनतेला यामुळे मतातील असा मिळणार आहे. विदर्भव्यतिरिक्त येत्या एक-दोन दिवसात मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. शिवाय ऑगस्टच्या शेवटी दक्षिण कोकणात देखील पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच ऑगस्टच्या अखेर कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.