ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार ! कोणत्या जिल्ह्यात अन किती दिवस बरसणार ? हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र ही बातमी सर्वाधिक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची ठरणार आहे. खरंतर राज्यात कोकणातील काही भाग वगळता जवळपास 13 ते 14 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून खरीप हंगामातील पिके करपण्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत. आता जर पाऊस पडला नाही तर खरिपातील पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला मात्र या चालू महिन्यात राज्यात कुठेच जोरदार पाऊस झालेला नाही.

यामुळे महाराष्ट्रात पावसाचा कमबॅक केव्हा होणार, पुन्हा एकदा जोरदार पावसाला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर भारतीय हवामान विभागाने दिले आहे. हवामान विभागाने आता महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा मोठा दावा केला आहे.

विशेष म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. निश्चितच जर राज्यात उद्यापासून पावसाला सुरुवात झाली तर खरीप हंगामातील पिकांना यामुळे नवीन जीवदान मिळेल असा आशावाद या आता व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक गुड न्यूज दिली असून महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ विभागात उद्यापासून पुढील चार दिवस पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होणार असे देखील IMD ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडरा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आयएमडीने येल्लो अलर्ट दिला आहे.

तसेच कोकणातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

निश्चितच उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने आता शेतकऱ्यांची धाकधूक कमी होणार आहे. तसेच जर हा अंदाज खरा ठरला तर खरीप हंगामातील पिकांना यामुळे नवीन जीवदान मिळणार आहे.

Leave a Comment