खुशखबर…! अहमदनगरमध्ये आज पासून ‘इतके’ दिवस पावसाची हजेरी, उर्वरित राज्यात कसे राहणार हवामान? पंजाबरावांचा हवामान अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Ahmednagar News : जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर या ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे पावसा संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. जवळपास पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने आता दुष्काळ पडणार की काय अशी भीती देखील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे विविध हवामान तज्ञांच्या हवामान अंदाजाकडे बारीक लक्ष लागून आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एक महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाब रावांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित एका शेतकरी मेळाव्यात ऑगस्ट महिन्यातील हवामानाबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. जॉन डियर ट्रॅक्टर्स यांनी तळेगाव येथे एक शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पंजाबराव डख यांना निमंत्रण देण्यात आले होते.

या मेळाव्यात बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती दिली. या शेतकरी मेळाव्यात जवळपास दोन ते तीन हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. या उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पंजाबरावांनी एक गुड न्यूज देखील दिली आहे.

पंजाबराव डख यांनी तळेगाव व आजूबाजूच्या परिसरात 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी संगमनेर समवेतच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा दावा केला आहे.

यंदा या भागात दुष्काळ पडणार नसून चांगला पाऊस पडेल या भागातील सर्व तळे भरून जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर आणि संगमनेर भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा पूर्वेकडून पाऊस आला असल्याने मराठवाडा, विदर्भ या विभागात जास्त पाऊस होत असून अहमदनगर आणि संगमनेर भागात परतीचा पाऊस जास्त होईल असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रात आता 16 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस पडेल. 18 ऑगस्ट पासून पाऊस वाढेल आणि 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यात खूप मोठा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Comment