Punjabrao Dakh : पंजाबराव डख यांचा ऑगस्टचा नवीन हवामान अंदाज; 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ‘अस’ राहणार हवामान, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj August : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात कस हवामान राहणार, कोणत्या कालावधीत पाऊस पडणार, कोणत्या कालावधीत पावसाची उघडीप राहणार याबाबत पंजाबरावांनी अतिशय महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जारी केली आहे.

खरंतर, काल भारतीय हवामान विभागाने राज्यात आगामी काही दिवस काही भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आगामी काही दिवस पाऊस सक्रिय राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

IMD ने आज आणि उद्या मुंबईसह दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे. उद्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आणि उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत आगामी काही दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब रावांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

काय म्हणताय पंजाबराव?
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलै महिन्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. मात्र आता एक ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरला आहे. एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे.

या कालावधीत दीर्घकाळ पाऊस पडणार नाही, तुरळक ठिकाणी 20 ते 30 मिनिटांचा पाऊस पडेल आणि नंतर लगेच ऊन पडेल अशी परिस्थिती राहणार आहे. तसेच 4 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची प्रामुख्याने उघडीप राहील असा अंदाज आहे.

13 ऑगस्ट नंतर मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाब रावांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी 13 ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्लादेखील पंजाब रावांनी दिला आहे. एकंदरीत जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता काही काळ पाऊस विश्रांती घेणार असल्याचे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment