Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान या पावसाळ्यात राज्यातील बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आतुरता लागून आहे.
येत्या पंधरा दिवसात निम्मा पावसाळा संपणार आहे पण अजूनही राज्यात जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच, भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
याशिवाय, आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये चीरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी काल अर्थातच 15 जुलै रोजी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात 17 जुलैपर्यंत सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
या कालावधीमध्ये मोठा पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. पण 17 जुलै नंतर वातावरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. राज्यात 18 जुलैपासून काही भागात मुसळधार पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे.
18 जुलै ते 21 जुलै या चार दिवसात राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. निश्चितच 18 जुलैपासून पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथील शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी ठरणार आहे.
वास्तविक, विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागात निश्चितच चांगला पाऊस झाला आहे मात्र सर्वदूर चांगल्या जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परंतु आता 18 जुलै ते 21 जुलै दरम्यान यासंबंधीत विभागात मुसळधार पाऊस पडणार असून नदी-नाले ओसांडून वाहतील अशी परिस्थिती तयार होऊ शकते असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
या कालावधीमध्ये मात्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार आहे. यानंतर पुन्हा राज्यात 23 जुलै नंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.
23 जुलै नंतर मात्र कोणत्या भागात पाऊस पडेल याबाबत डख यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. येत्या दोन-तीन दिवसात याबाबत पंजाब डख पुन्हा एकदा सविस्तर माहिती देणार आहेत.