Panjabrao Dakh News : शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातुन गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव संकटात आले आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे.
विशेष म्हणजें काही भागात कडक ऊन देखील पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. पण पावसाचा जोर कमी झाला असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांची चिंता वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने 10 ऑगस्टपर्यंत कोकणात आणि आठ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज आहे.
अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पंजाबरावांनी राज्यात 15 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तसेच 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे त्यांनी नमूद केले आहे.
18 ते 19 ऑगस्ट नंतर राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील पावसाबाबत देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात जरी कमी पाऊस होणार असला तरी देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस बरसणार आहे.
तसेच यंदा दिवाळीमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. खरंतर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये जोरदार पाऊस झाला होता. आता यंदाही तशीच परिस्थिती राहणार असून दिवाळीमध्ये जोरदार पाऊस पडणार असे सांगितले जात आहे.
यावर्षी 2022 प्रमाणेच जोरदार मानसून राहणार असून राज्यातील सर्व तळे फुल भरतील असा आशावाद देखील पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.