पीएम किसानचा 15वा हफ्ता खात्यात आला नाही ? ‘या’ नंबरवर एक फोन करा, लगेच मिळणार….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : केंद्र शासनाने 2019 मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता. केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाअन्वये देशात पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महात्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली.

तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातोय.

दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्त्यांमध्ये हा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना 15 हफ्ते देण्यात आले आहेत.

मागील 15वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील साडेआठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटन दाबून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पंधरावा हप्ता अर्थातच दोन हजार रुपये जमा केले आहेत.

मात्र या योजनेचा पंधरावा हफ्ता शासनाने जारी केला असला तरी देखील या योजनेच्या अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार केली आहे.

अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा गेला हफ्ता म्हणजे 15वा हफ्ता (Pm Kisan Yojana 15th Installment) मिळालेला नसेल त्यांनी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबरवर (Pm Kisan Yojana Helpline Number) संपर्क साधला पाहिजे.

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून शेतकरी बांधव त्यांचा हप्ता का अडकला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

जर काही कारणास्तव तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्ही या योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

155261 या हेल्पलाइन नंबरवर किंवा 1800115526 या नंबरवर किंवा मग 011-23381092 या क्रमांकावर कॉल करून शेतकरी बांधव त्यांना पंधरावा हफ्ता का मिळाला नाही याबाबत विचारणा करू शकतात.

Leave a Comment