Soyabean Rate Maharashtra : गेल्या एका वर्षापासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी खूपच डोईजड ठरले आहे. मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने पिवळं सोन शेतकऱ्यांसाठी कवडीमोल ठरत आहे. बहुकष्टाने उत्पादित केलेल्या सोन्यासारख्या सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव संकटात आले आहेत.
जवळपास एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावत आहेत. सध्या बाजारात नवीन हंगामातील मालाची आवक होत आहे, पण मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव संकटात पाहायला मिळत आहे.
दिवाळीचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आली आहे मात्र मालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठी उदासी पाहायला मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला राज्यात सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी देखील चांगला भाव मिळण्याची आशा होती. पण असे काही झाले नाही.
गेल्या हंगामापासून सोयाबीनचे दर बाजारात दबावातच आहेत. विशेष म्हणजे या नवीन हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच सोयाबीनचे बाजार भाव हमीभावापेक्षा कमी होते. आता राज्यातील काही बाजारात हमीभावापेक्षा थोडासा अधिक भाव सोयाबीनला मिळत आहे.
विशेष म्हणजे आता राज्यातील बहुतांशी बाजारात सोयाबीनच्या कमाल बाजार भावाने 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनचे कमाल बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत.
यामुळे सोयाबीनची सहा हजाराकडे वाटचाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु शेतकरी बांधवांना सोयाबीनला किमान 7000 रुपयाचा दर मिळाला पाहिजे असे वाटत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, यंदा मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट येणार आहे. यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरच त्यांना या पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.
कुठे मिळाला विक्रमी दर ?
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज सोयाबीनची 3420 क्विंटल आवक झाली होती. आज या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4500, कमाल 5400 आणि सरासरी 5000 एवढा भाव मिळाला आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळतं आहे. ऐन दिवाळीच्या काळात बाजारभावात थोडीशी वाढ झाली असल्याने सणासुदीच्या काळात राज्यातील सोयाबीन उत्पादकांना निश्चितच यामुळे दिलासा मिळणार आहे.