शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाचा नवीन वाण विकसित, मिळणार 80 क्विंटल पेक्षा अधिकचे उत्पादन, गव्हाला जास्तीचा दरही मिळणार, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : गहू हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. पंजाब, हरियाणा समवेतच आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते.

अशातच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गव्हाचा नवीन वाण विकसित झाला आहे. गव्हाचा हा नवीन वाण डायबिटीस रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर राहणार आहे.

या नव्याने विकसित झालेल्या गव्हामध्ये असलेले औषधी गुणधर्म डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. यामुळे बाजारात या गव्हाला सामान्य गव्हाच्या तुलनेत अधिक बाजार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आज आपण गव्हाचा हा वाण कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे आणि या वाणाच्या विशेषता काय आहेत याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाचा हा नवीन वाण कोणी विकसित केला? 

मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाच्या या नवीन जातीचा शोध लावला आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना या जातीच्या गव्हाच्या पिठाचा खूप फायदा होणार आहे. कारण की हे शुगर फ्री गव्हाचे पीठ राहणार आहे.

यामुळे बाजारात या जातीच्या गव्हाला मोठी मागणी राहणार आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या जातीचे नाव PWRS 1 असे ठेवण्यात आले आहे. PBW RS 1 या वाणाच्या गव्हात इतर जातींपेक्षा सुमारे 66 टक्के जास्त स्टार्च आहे.

यात 30.3% प्रतिरोधक स्टार्च आहे, जे शुगर असलेल्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. गव्हाचा हा वाण शेतकरी बांधव 20 ऑक्टोबरपासून पेरू शकतात. म्हणजे 20 ऑक्टोबर नंतर या जातीच्या गव्हाची पेरणी शक्य आहे. गव्हाची ही जात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच उत्पादन देण्यास तयार होणार आहे.

या जातीच्या गव्हाची काढणी ही मार्च महिन्यात सुरू करता येत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. गव्हाच्या या जातीपासून 50 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave a Comment