विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी केव्हा करावी ? पंजाबरावांनी एका वाक्यात सांगितलं, काय म्हटले डख 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी जोरात सुरू आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आगात सोयाबीनची पेरणी केली होती त्यांच्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. काही ठिकाणी या चालू खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे.

मराठवाड्यातील हिंगोली एपीएमसीमध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक होत आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही नवीन सोयाबीन आता बाजारात चमकू लागला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पूर्व मौसमी कापूस लागवड केली होती त्या शेतकऱ्यांची कापूस वेचणीची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत.

ज्या ठिकाणी अजून सोयाबीनचे पीक परिपक्व झालेले नाही त्या ठिकाणी आगामी काही दिवसात सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. एकंदरीत आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक पेरणीपूर्वी आवश्यक असलेली पूर्व मशागतीची कामे देखील सुरू झाली आहेत.

अशातच मात्र शेतकऱ्यांकडून एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे तो म्हणजे गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी केव्हा करायची. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी स्वतः दिले आहे. खरंतर रब्बी हंगामात हरभरा आणि गहू या दोन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आपल्या राज्यात गहू आणि हरभरा लागवडी खालील क्षेत्र खूप अधिक आहे.

दरम्यान या दोन्ही पिकाच्या शेतीमधून चांगले विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी या पिकांची पेरणी योग्य वेळी होणे आवश्यक असते. जर गव्हाची आणि हरभऱ्याची उशिराने पेरणी झाली तर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती असते. अशा स्थितीत गहू आणि हरभरा केव्हा पेरावा हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर पंजाबरावांनी दिले आहे.

केव्हा पेरणी करावी ?

पंजाबराव डख म्हणतात की, गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक छोटासा प्रयोग करून बघितला पाहिजे. शेतकऱ्यांनी एका स्टीलच्या वाटीत खोबरेल तेल घ्यावे आणि ती वाटी घराच्या खिडकीवर ठेवावी. ज्यावेळी स्टीलच्या वाटीमधील खोबरेल तेल घट्ट होईल त्यावेळी शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पेरणीला सुरुवात करावी. म्हणजे ज्यावेळी थंडीचे प्रमाण वाढेल त्यावेळी गहू आणि हरभरा पेरणीस सुरुवात केली पाहिजे.

हरभरा पेरताना या गोष्टींची काळजी घ्या

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, हरभरा पेरणी करण्यापूर्वी रोटावेटर मारून जमीन तयार करून घेतली पाहिजे. यानंतर हरभऱ्याच्या सुधारित जाती निवडायच्या आहेत. हरभरा पेरणी करताना 18 इंच किंवा 24 इंचावर पेरणी करायची आहे. हरभरा पिकासाठी एक खताची बॅग आणि दहा किलो गंधक वापरायचे आहे. पेरणी खोलवर करायची आहे. एकरी 35 ते 40 किलो एवढे बियाणे वापरायचे आहे.

पेरणी केल्यानंतर जर जमिनीत ओल नसेल तर त्याच दिवशी पाणी भरायचे आहे. पहिले पाणी देताना स्प्रिंकलर ने देत असाल तर दोन तास पाणी द्यायचे आहे. दुसरे पाणी पेरणीनंतर 20 दिवसांनी द्यायचे आहे आणि पाच तास स्प्रिंकलर चालू ठेवायचे आहे. तिसरे पाणी पेरणीनंतर 40 दिवसांनी द्यायचे आहे आणि सात तास स्प्रिंकलर चालू ठेवायचा आहे. तसेच पंजाबरावांनी फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण द्यावा असा सल्ला दिला आहे.

Leave a Comment