गुड न्यूज; बंगालच्या उपसागरात झाला मोठा हवामान बदल, आता ‘या’ तारखेपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचा खूप वेग वाढला होता. महाराष्ट्रात सात सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणसह विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत होता. मात्र 10 सप्टेंबर पासून राज्यातील कोकण वगळता उर्वरित भागातून पावसाचा जोर कमी झाला आहे.

यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना पावसाचा मोठा खंड पडणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. दरम्यान सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पिके पुन्हा एकदा नव्याने डोलू लागली आहेत. पण आजही राज्यात असे काही जिल्हे आहेत जे पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.

अशातच कोकण वगळता अन्य भागातून पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना गणपती बाप्पा मदतीला धावून येणार आहे. कारण की यंदा गणेशोत्सवात मोठा पाऊस पडणार अशी शक्यता आहे. हवामान तज्ञांनी बंगालच्या उपसागरात हवामानात मोठा बदल होत असल्याने येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा पाऊस जोर पकडणार असल्याचे सांगितले आहे.

सोमवारी मुंबईसह संपूर्ण राज्यातून पावसाने दांडी मारली आहे. मात्र आता सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात नवीन चक्रिय वाऱ्याची परिस्थिती तयार होणार आहे. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात ही परिस्थिती दोनदा तयार होणार आहे.

पहिली चक्रीय वाऱ्याची परिस्थिती ही 12 सप्टेंबरला अर्थातच आज तयार होणार आहे. तसेच या चक्रीय वाऱ्याचे रूपांतर कमी दाब क्षत्रात होण्याची शक्यता आहे. यामुळे 15 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे. या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच 14 सप्टेंबर पर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार असा अंदाज आहे.

काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. 14 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर या कालावधीत मध्यम पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment