ऑगस्ट संपतोय; महाराष्ट्रात मुसळधार पावसाला केव्हा सुरवात होणार ? पुणे हवामान विभागाच्या शिल्पा आपटे यांनी थेट तारीखच सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पण पावसाची तीव्रता खूपच कमी आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागली आहे.

यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी देखील शेतकऱ्यांना गरज आहे ती मोठ्या पावसाची. या रिमझिम पावसामुळे शेती पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी देखील जोवर विहिरींना पाणी उतरत नाही, धरणाच्या जलाशयात वाढ होत नाही तोवर खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम धोक्यातच राहणार आहे.

यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू असतानाही शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत. खरतर गेल्या जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला होता. सर्वत्र नदी नाले भरून वाहिले होते.

गेल्या महिन्यातील जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील जोरदार पाऊस होणार अशी भोळी भाबडी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु या ऑगस्ट महिन्यात एकही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडला नाही.

आता ऑगस्ट महिना संपण्यास मात्र आठ ते नऊ दिवसांचा काळ बाकी आहे. अशा परिस्थितीत आता राज्यात जोरदार पाऊस सप्टेंबर महिन्यातच पडणार की काय ? असे चित्र तयार होत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या हवामानातज्ञ शिल्पा आपटे यांनी पावसासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

आपटे यांनी महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस केव्हा सुरू होणार याची थेट तारीख जाहीर केली आहे. आपटे यांनी सांगितल्याप्रमाणे, मान्सून आता उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीच परिस्थिती तयार होत नाहीये. मात्र राज्यातील चारही विभागात म्हणजेच कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

24 ऑगस्ट नंतर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन विभागात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अर्थातच जोरदार पावसासाठी शेतकऱ्यांना आता 24 ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागणार आहे. दरम्यान 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असे आपटे यांनी नमूद केले आहे. 

Leave a Comment