पावसाची तारीख पे तारीख ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस जोर धरणार नाही, केव्हा कोसळणार मुसळधार? IMD म्हणतंय….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : यंदा मानसून जवळपास पाच दिवस उशिराने महाराष्ट्रात दाखल झाला. एरवी 7 जूनला दाखल होणारा मान्सून यंदा अकरा जूनला महाराष्ट्राच्या वेशीत आला. विशेष म्हणजे राज्यात मान्सून दाखल होऊनही अनेक दिवस पाऊस पडला नाही.

राज्यात 22 जून नंतर पावसाला सुरुवात झाली. जून अखेर राज्यातील कोकण आणि विदर्भातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सऱ्या बरसल्या. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे यावर्षी पावसाची काही खरे नाही असे बोलले जात होते.

पण जुलै महिन्यात पावसाचा जोरदार कमबॅक पाहायला मिळाला. जुलै महिन्यात राज्यातील सर्वच विभागात जोरदार पावसाची हजेरी लागली. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्याची पावसाची तूट भरून निघाली.

मात्र आता गेल्या 22 दिवसांपासून महाराष्ट्रात एकदाही मुसळधार पाऊस झालेला नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाच्या सऱ्या पाहायला मिळत आहेत. पण खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक असलेला जोरदार पाऊस गायब झाला आहे.

यामुळे मान्सून महाराष्ट्रावर रुसला असल्याचे बोलले जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने एक हवामान अंदाज वर्तवला आहे. सदर अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस मान्सूनला पोषक परिस्थिती नाहीये. पोषक परिस्थिती अभावी राज्यात पुढील काही दिवस अशाच श्रावण सऱ्या बरसणार आहेत.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात आणखी किमान तीन दिवस जोरदार पाऊस होणार नाहीये. पावसाचा हा लपंडाव पुढील किमान तीन दिवस सुरू राहणार आहे. मात्र तदनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे राज्यात 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.

IMD म्हणतंय की, मोसमी वारे सध्या हिमालयाच्या दिशेला आहेत. यामुळे उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी देखील होत आहे. प्रामुख्याने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हा वायव्य दिशेकडे सरकला आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण तयार होत आहे परंतु पाऊस पडत नाहीये. मात्र ही परिस्थिती आणखी तीन दिवस कायम राहिल आणि त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

25 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. एकंदरीत येत्या काही दिवसात शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेची जोरदार पावसाची आतुरता संपणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment